प्रतिनिधी : अशोक अधाने
www.themaharastratoday.com
दिनांक: 17 जुलै 2025
वेरूळ, ता. १७ जुलै – माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि खासदार डॉ. भागवतजी कराड साहेब यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सपत्नीक वेरूळ येथील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी म्हैसमाळ येथील श्री बालाजी मंदिरात दर्शन घेतले तसेच भद्र मारोती मंदिरात अभिषेक करून दर्शनाचा लाभ घेतला.
या धार्मिक व शुभ प्रसंगी रत्नपुर तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. कराड साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, भद्र मारोती संस्थांचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, शहराध्यक्ष परसराम बारगळ, तालुका सरचिटणीस सतीश दांडेकर, मा. नगरसेवक योगेश बारगळ, मा. नगरसेवक अविनाश कुलकर्णी, अरुण अघाडे, शहर सरचिटणीस दिनेश कायस्थ, गणेश हजारी, शंकर अंभोरे, काशिनाथ तुपे, कृष्णा चव्हाण, राजेंद्र राठोड यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने धार्मिक स्थळांना भेट देत भक्तिभावाने अभिषेक व पूजा करून, डॉ. कराड यांनी जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार केला.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन