महिलांची छेड काढणाऱ्या मनोरुग्णास बेगमपुरा पोलिसांनी व माणुसकी टिम च्या मदतीने पुणे येरवडा येथे उपचारासाठी केले दाखल
त्या माथेफिरु क्रीमीनल वृत्तीच्या मनोरुग्णाच्या गुंडगिरी व दहशिती मुळे शहरातील नागरिक व महिला झाल्या होत्या ऋस्त
येरवडा (पुणे) येथे त्यास माणुसकी टिम ने या आधी आतापर्यंत, ४ वेळेस उपचारासाठी दाखल केले होते.मागच्या वेळेस नेत असताना रुग्णवाहिके मध्ये समाजसेवक सुमित पंडित व पोलिसांवर केला होता प्राणघातक हल्लाकरुन ॲम्बुलन्स देखील फोडली होती
संभाजीनगर येथे मध्यवर्ती बसस्थानक तसेच घाटी व विद्यापीठ परिसरात दादागिरी करने चाकु चा धाक दाखवुन लुटने गाड्या थांबविने रोजवरुन जानाऱ्या महिलांची छेड काढणे, अंगावरील कपडे काढुन नग्ण अवस्थेत फिरने अश्या अनेक गैरप्रकार तो करत होता एवढंच नाही तर त्यास आई व एक ११ वर्षांचा मुलगा देखील आहे.तो आईला नेहमी मारहाण करीत होता त्यांला क्रांती चौक पोलीसांनी समज दिली होती.त्यास पुणे येरवडा येथे नेने येवढे सोपे नव्हते परंतु आज घाटि परीसरात गुंडगीरी करनाऱ्या क्रिमिनल वृत्तीच्या मनोरुग्ण गुडांला बेगमपुरा पोलीसांच्या मदतीने अखेर हातात बेड्या ठोकल्या.माणुसकी समुहाच्या टिम ने घाटि रुग्णालयात उपचारासाठी रात्री उशिरापर्यंत शोध घेवुन प्रथम उपचारासाठी दाखल केले.घाटित तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले डॉ यांनी सांगितले,असता त्यास कागदोपत्री पुर्तता करुन बेगमपुरा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ कारवाई करुन बेगमपुरा पोलीस स्टेशन चे कर्मचारी सोबत देवुन त्यास शासकीय वाहनाने प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा पुणे येथे वार्ड क्रमांक ३२ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.सुमित पंडित यांचे मनोरुग्ण सेवेतील काम खरच एक धोका पत्करून करत असलेलं काम आहे. यावेळी संभाजीनगर पोलीस आयुक्त संदिप पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक. नितिन बगाटे,सहाय्यक पो.आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा येथील पोलीस निरिक्षक मंगेश जगताप साहेब पोलीस उप निरिक्षक विनोद भालेराव साहेब,पो.अ.भानुदास जाधव,दिपक मालकर,प्रकाश मानवते,विजय नीकम, उमेश चव्हाण,बेगमपुरा पोलीस व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित व टिम ने मदतकार्य केले.
मनोरुग्णांसाठी काम करणे सोपे नाही.

संभाजीनगर शहरामध्ये अक्षरशः गुंडगिरी करून लोकांना मारहाण करणारा हा मनोरुग्ण याला मी बेगमपुरा पोलीस स्टेशन यांच्या साह्याने हॉस्पिटलमध्ये मनोरुग्ण तपासणी करून येरवडा कारागृह पुणे येथे नेत असताना माझ्यावर प्राणघातक हल्ला त्याने केला ,माझा गळा आवळण्याचा प्रयत्न केला,माझ्यासोबत ची कोर्ट ऑर्डर फाडण्याचा प्रयत्न केला,मोबाईल फोडला,हेडफोन तोडून, मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली,मनोरुग्ण हा शेवटी मनोरुग्ण असतो त्यामुळे ते काय करतील हे सांगता येत नाही तरिहि त्यास मनोरुग्ण यास येरवडा येथे उपचारासाठी नेने गरजेचे होते म्हणून मी धोका पत्करून मदतीसाठी पुढे आलो.मनोरुग्णांचे काम करणे सोपे नाही.
———— समाजसेवक सुमित पंडित
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!