महावाचन उत्सव 2024 निमित्त महाविद्यालयात ग्रंथ दिंडी चे आयोजन व तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन
आज राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव येथे आज महावाचन उत्सव 2024 निमित्त महाविद्यालयात ग्रंथ दिंडी चे आयोजन व तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माननीय श्री.साईनाथ पाटील जाधव साहेब हे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटक श्री. केवट साहेब (गटशिक्षण अधिकारी, खुलताबाद),श्री. नदीम साहेब ( केन्द्र प्रमुख , गदाना), श्री.बांदल सर (माजी प्राचार्य, गंगापूर) हे होते.
प्रथमतः विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी निघाली.त्यामध्ये विद्यार्थी पारंपारिक वेषात टाळ, घोषवाक्य घेऊन निघाले.यानंतर दिंडीमध्ये अध्यक्ष व प्रमुख पाहुणे सुध्दा सामील झाले. श्री. केवट साहेब यांच्याहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जिते सर यांनी केले तर आभार प्रशासकीय अधिकारी श्री.गोमलाडु सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यास प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .
More Stories
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश..! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता
ग्रामपंचायत गदाना व ग्रामस्थांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी – एमएसईबी कार्यालयातील अधिकारी गैरहजर, पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर
खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर