March 15, 2026

महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना मेस्टाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्र उत्साहात संपन्न

 

बंद होणाऱ्या शाळा सरकारने मेस्टाला द्याव्यात—- डॅा. संजयराव तायडेपाटील संस्थापक अध्यक्ष – मेस्टा—

द महाराष्ट्र टुडे

खुलताबाद:- ११ ऑक्टोबर रोजी बुधवारी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना मेस्टाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे उद्घाटक डॅा. संजयराव तायडेपाटील ( संस्थापक अध्यक्ष मेस्टा – छत्रपती संभाजीनगर) कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. विजय पवार ( महा.प्रदेश कार्याध्यक्ष मेस्टा – बीड) हे होते. तर प्रमुख उपस्थिती मेस्टाचे प्रवक्ते प्रा.सोमनाथ वाघमारे व कोषाध्यक्ष मनिष हांडे सर, ( छत्रपती संभाजीनगर) हे होते

मेस्टा संघटना संस्थापक अध्यक्ष यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की,
महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना मेस्टाच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रात सध्या सुरू असलेला वादग्रस्त विषय शाळा बंद करणे किंवा दत्तक देणे या विषयावर संघटनेची भुमिका विषद करतांना ते म्हणाले की, कमी पटसंखेच्या शाळा बंद करून गोर- गरीबांच्या लेकरांचे शैक्षणिक नुकसान कशाला करता ? सरकारची शाळा चालवण्याची ऐपत नसेल तर ना नफा ना तोटा या धर्तीवर त्या शाळा त्या त्या जिल्हा्यात , तालुक्यात , गावा-गावात मेस्टाचे सदस्य असलेले इंग्रजी शाळा संस्थाचालकांना चालवायला द्या आमच्याकडे दर्जेदार शिक्षण देण्याचा अनुभव आहे.
यावेळी मेस्टा ॲड. अविनाश औटे,जिल्हा अध्यक्ष सुनिल मरकड उपाध्यक्ष सुरेश वाघचौरे संभाजीनगर शहराध्यक्ष राजु नगरकर संतोष सोनवणे
महिला जिल्हाअध्यक्ष आर्चना आहेर ,नाहेद खान यांनी केले आहे.