November 16, 2025

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर व्हावे, यासाठी संघटनेचा पाठपुरावा

 

— रिपोर्टर अशोक अधाने
मो. 9623871987
www.themaharashtratoday.com

मुंबई, १५ फेब्रुवारी: राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मिडिया धोरण लागू करावे, यासाठी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी दिली.

मुंबईच्या मालाड येथील राजोरा बँक्वेट हॉल येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी माने यांनी संघटनेच्या वाढत्या कार्यक्षेत्राची माहिती दिली तसेच ६ एप्रिल रोजी होणाऱ्या अधिवेशनाबाबत चर्चा केली.

मीडिया धोरणासाठी ठोस पावले

डिजिटल मीडिया धोरण राबवण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी तालुका ते मंत्रालय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यासोबतच पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी स्थापन करण्यात आलेल्या “प्रतिबिंब प्रतिष्ठान” बद्दलही माने यांनी माहिती दिली.

“संघटनेचा प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. पत्रकारांनी उद्योगी (व्यवसायिक) असले पाहिजे, पण कोणत्याही परिस्थितीत खंडणीखोर नसावा. डिजिटल मीडियाला समाजमान्यता आणि लवकरच शासनमान्यता मिळेल,” असे राजा माने यांनी स्पष्ट केले.

वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार

संघटनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भैरे यांच्या नेतृत्वात माने यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार, संगीत सकाळ आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी कामगार नेते अभिजीत राणे, राज्य कार्यकारिणी सदस्य मयूर गलांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघुळे, सचिव यतीन पवार तसेच मुंबई विभागातील विविध पदाधिकारी, संघटनांचे नेते आणि पत्रकार उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाची आणि संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली.