दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२३
मराठा आरक्षणाला दोन महिन्याचा वेळ देण्यात आला आहे त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळते कि फक्त आमिषांना सामोरे जावे लागते हे पाहणेही गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांचे कार्यक्रमाचे किंबहुना धार्मिक कार्यक्रमांचे सूत्र हलविण्यास सुरवात झालेल्या ठिकाणी मराठा समाजाकडून त्या कार्यक्रमांना खो देण्याचे कामही सुरूच आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धाम सरकार यांच्या ६,७ व ८ नोव्हेंबर २०२३ रोजी रेल्वे स्टेशन रोड, आयोध्यानगरी मैदान येथे किंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमाचे गावागावामध्ये बॅणर होल्डिंग लावण्यात आल्या परंतु मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी ठराव घेतलेल्या गावांमध्ये त्याचे बॅणर होल्डिंग राजकीय पुढाऱ्यांना काट करून घेण्यात आली.
विविध गावांमध्ये हेच चित्र राहिले तर मराठा समाजाला आरक्षणाच्या ध्येयापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही.

More Stories
पक्षी ‘पाकोळी’ पक्षास निसर्गमित्राने दिले जीवनदान असंख्य पक्षांना दिले जीवनदान; सेवेतून मिळतो आनंद – देविदास थोरात
संवेदनशील प्रकरणात निष्काळजीपणा भोवला? तामिळनाडूत तीन IPS अधिकारी निलंबित
‘सावंगी ते मिटमिटा १२ किमी ग्रीनफिल्ड रिंग रोड’ प्रकल्प पुन्हा मार्गी लागावा, यासाठी विभागीय आयुक्त साहेबांना सविस्तर निवेदन