गुरुवार दि.२१ सप्टेंबर २०२३
बुधवार दिनांक 20/09/2023 रोजी राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, घोडेगाव राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे आज मराठवाडा पदवीधर संघाचे आमदार माननीय श्री. सतीश भाऊ चव्हाण व माजी आमदार श्री.कैलास पाटील यांची महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.साईनाथ पाटील जाधव साहेब हे होते.तर मुख्य अतिथी मराठवाडा पदवीधर संघाचे आमदार माननीय श्री.सतीश भाऊ चव्हाण,माजी आमदार श्री. कैलास पाटील,महेश उबाळे,श्री.द्वारकादास पाटील जाधव हे होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मा श्री.सतिश भाऊ चव्हाण व श्री.कैलास पाटील साहेब यांचे स्वागत श्री.साईनाथ पाटील जाधव साहेब यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचेसंस्थापक अध्यक्ष माननीय श्री.साईनाथ पाटील जाधव साहेब यांनी केले. त्यानंतर श्री.सतीश चव्हाण साहेबांचे भाषण झाले.त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विविध विषयांवर प्रश्न विचारले.त्यांनी महाविद्यालयास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.अभ्यासिका व कॉम्पुटर लॅब देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती.ठाकूर मॅडम यांनी केले . नंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨