June 12, 2025

बोडखा येथे “एक दिवस गावकऱ्यांसोबत” उपक्रमांतर्गत पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

खुलताबाद  (वार्ताहर) –  (ता. 12 मार्च 2025 ) – माननीय विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून आयोजित “एक दिवस गावकऱ्यांसोबत” या उपक्रमांतर्गत बोडखा येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास तब्बल 120 पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.

मेळाव्यात विविध शैक्षणिक आणि बौद्धिक उपक्रम राबवण्यात आले. पालकांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत मुलांसोबत कसे वागावे, त्यांचे संगोपन कसे करावे याबाबत मार्गदर्शन घेतले. तसेच, गावातील स्त्री-पुरुष पालकांनी दोरीच्या खेळात सहभाग घेत मेंदूच्या चेतापेशींना चालना देण्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती मिळवली.

कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंध, लेक लाडकी योजना आणि लाडकी बहिणी योजना यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. दुपारी १२ ते १ दरम्यान विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

या पालक मेळाव्यात गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, सरपंच तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे, हा तालुक्यातील तिसरा पालक मेळावा असून, टाकळी विभागातील सर्व अंगणवाडी सेविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

पर्यवेक्षिका श्रीमती रजनी जोशी आणि श्रीमती शोभा शिंदे (दौंड) यांनी मार्गदर्शन केले, तर बालशिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच सेविकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

गावकऱ्यांनी या उपक्रमाबाबत सकारात्मक अभिप्राय नोंदवले असून, पालक मेळावा अत्यंत यशस्वी झाल्याचे मत व्यक्त केले.

 

 

जाहिरात बातम्यांसाठी संपर्क

✍️ वार्ताहर – अशोक अधाने

📞 मोबाईल – 96 23 87 19 87