July 9, 2025

प्रवेशोत्सवात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची विशेष उपस्थिती

 

 

वार्ताहर : अशोक अधाने | गदाना | १६ जून २०२५

राज्य शासनाच्या “100 शाळांना भेटी देणे” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आज छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार यांनी जिल्हा परिषद शाळा, गदाना येथे इयत्ता पहिलीच्या प्रवेशोत्सवात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय जीवनाची सुंदर सुरुवात करून दिली.

या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट, शालेय साहित्य व स्केच पेन देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच मोफत पाठ्यपुस्तक व गणवेशांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना त्यांनी आपल्या शालेय आठवणी सांगितल्या व अभ्यासाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

“100 शाळांना भेटी देणे” उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा गदाना येथे प्रेरणादायी संवाद

इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. धनश्री अधाने हिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले, “लहानपणी मला इतिहास विषयाची विशेष आवड होती.” आयएएस अधिकारी होण्यासाठी काय तयारी आवश्यक आहे, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य, चालू घडामोडींचा अभ्यास, सर्वसामान्य ज्ञान वृद्धी आणि आवश्यकतेनुसार पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शहरांतील कोचिंगचा आधार घेण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी “ट्वेल्थ फेल” या चित्रपटाचा दाखला देत यश मिळवण्यासाठी फक्त गुण नव्हे, तर जिद्द महत्त्वाची असते, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शालेय शिक्षिका रूपाली कस्तुरे मॅडम यांनी केले. मुख्याध्यापक नदिम शेख सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली, तर स्वाती काळे मॅडम यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये
– शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर,
– खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फराटे,
– पोलीस निरीक्षक श्री. बनसोड,
– ग्रामपंचायत सरपंच सौ. सविता पोपट चव्हाण,
– उपसरपंच कैलास बडुगे,
– भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण,
ग्रामपंचायत सदस्य:
– राजू चव्हाण,
– जनार्दन वाहुळ,
– वैजीनाथ अधाने,
– काकासाहेब अधाने,
पालक वर्ग :
– संजय चव्हाण,
– ज्ञानेश्वर महाराज कुकलारे
कचरू वाघ, चंद्रभान चव्हाण यांचा समावेश होता.
पत्रकार : पोपट चव्हाण, अशोक अधाने.
समाजसेवक : अरुण अधाने यांची विशेष उपस्थिती होती.

शाळेतील शिक्षकवृंद – सदावर्ते सर, काझी सर, तायडे सर, चव्हाण सर, जाधव सर, वाघ मॅडम, खंडागळे मॅडम, अधाने मॅडम, पिसे मॅडम, तसेच आंगणवाडी सेविका दीक्षित मॅडम यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा व प्रेरणा देणारा हा प्रवेशोत्सव आनंददायी व संस्मरणीय ठरला.