February 8, 2026

“प्रत्येक यशस्वी पुरुषामागे, एका स्त्रीचा हात असतो..!”

“तळ्यापासून पुरुषांनी सावध रहावे…”

एका मोठ्या तळ्याच्या करोडपती मालकाने तळ्यावर एक स्पर्धा लावली. “शेकडो मगरी असलेल्या या तळ्यात जो कोणी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सुरक्षित पोहून जाईल… त्याला 50 लाखाचे बक्षीस मिळेल. आणि जर का यात तो मगरींकडून मारला गेला… *तरी त्याच्या वारसाला 10 लाख मिळतील”.

तिथे आलेल्या शेकडोपैकी एकही माणूस हे आव्हान स्विकारायला तयार नव्हता.

*पण काही वेळानंतर अचानक एकाने तळ्यात उडी मारली. त्याला पकडायला आलेल्या मगरींचा ???????????????? जीवघेणा पाठलाग पाहून जिवाच्या आकांताने पोहून त्याने कसेबसे तळ्याचे दुसरे टोक गाठले आणि शर्यत जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. त्याला त्वरित ५० लाखाचे बक्षीस देण्यात आले.

पण तो अजूनही भीतीमुळे थरथर कापत होता. किना-यावर बसल्यावर थोड्या वेळाने त्याने रागाने ओरडून विचारले,
“मला मागून कोणी तळ्यात ढकललं ते सांगा ?”.

बघतो तर काय, ज्या व्यक्तीने त्याला तळ्यात ढकलले,ती खुद्द त्याचीच बायको होती.

त्याच्या सुशील समंजस बायकोचा दृष्टीकोन हा होता की,
जिंकले तर 50 लाख , हरले तरी 10 लाख मिळणार होतेच????.

आणि तेव्हापासूनच ही म्हण अस्तित्वात आली, ????

“प्रत्येक यशस्वी पुरुषामागे,
एका स्त्रीचा हात असतो…..”