दि. 07 जुलै 2024 प्रतिनिधी : अशोक अधाने
खुलताबाद: पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याने यंदाचा प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार आमदार प्रशांत बंब यांना जाहीर केला आहे. बंब यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रशांत बंब हे एक प्रतिष्ठित आमदार असून, त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. कामगाराच्या कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना आणि श्रावण बाळ योजना यांसारख्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम ते यशस्वीपणे करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कृतिशील आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
तसेच, हजारो हिंदू, मुस्लिम, बौद्ध व सर्व समाजातील जनतेला अजमेर, अष्टविनायक आणि बौद्धगया या तीर्थक्षेत्रांचे दर्शन आमदार प्रशांत बंब हे घडवून आणत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य व एकात्मता वाढीस लागली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ 11 ऑगस्ट रोजी पत्रकार सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, जिथे आमदार प्रशांत बंब यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पत्रकार सेवा संघाने त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश..! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता
ग्रामपंचायत गदाना व ग्रामस्थांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी – एमएसईबी कार्यालयातील अधिकारी गैरहजर, पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर
खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर