— वार्ताहर : अशोक अधाने
मो.९६२३८७१९८७
www.themaharashtratoday.com
गदाना, दि. ७ फेब्रुवारी २०२५ – न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, गदाना येथे आज दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय अध्यक्षा श्रीमती पूर्णताई अधाने होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामदास गायकवाड सर (गायकवाड एज्युकेशन ग्रुप) उपस्थित होते. तसेच शालेय समिती सदस्य श्री रामराव अण्णा अधाने, श्री मधुकर ठेंगडे, तसेच प्राचार्य श्री आर. आर. पवार सर यांचीही या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संस्कृती जाधव व कु. गायत्री अधाने यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. शुभांगी बोडखे हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धनवे सर, तर पाहुण्यांचा परिचय श्री देशमुख सर यांनी करून दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक प्रमुख श्री गायकवाड सर आणि सर्व सहकारी शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨