“बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण”
दि.२७ ऑगस्ट २०२३
गंगापूर व खुलताबाद तालुक्यात वन्यजीव प्राण्यांचे शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करत असल्याने आमदार प्रशांत बंब यांनी वनविभाग यांना २५/०८/२०२३ रोजी पत्र दिले.
पहा संपूर्ण माहिती..!
जा.क्र./कार्या/विका/छ.सं./१९५४३
दि.२५/०८/२०२३
प्रति,
मा.उप वनसंरक्षक,
बन विभाग, प्रादेशिक कार्यालय,
रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर.
विषय:-मौजे सावखेडा, ता.गंगापूर परिसरातील विविध ठिकाणांमध्ये बिबट्याचा वावर असल्याने
त्या ठिकाणी तात्काळ पिंजरे बसवणे तसेच खुलताबाद तालुक्यातील वन्यप्राण्यांचा देखील
बंदोबस्त बाबत….
महोदय,
उपरोक्त विषयान्वये, मौजे सावखेडा, ता.गंगापूर गावांमध्ये बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये
भितीचे वातावरण आहे. सावखेडा परिसरातील शंकरपूर, बोरुडी, महालक्ष्मीखेडा, पांढर ओहळ, मांडवा, तांदुळवाडी,
देवकरवाडी, इत्यादी गावांमध्ये नागरिकांना बिबट्या आढळून आला आहे. तसेच शेतकऱ्यांचे जनावरांवर हल्ला
करत आहे. आतापर्यंत ३ जनावरे या हल्यामध्ये दगावली आहेत. त्यामुळे शेतकरी भयभयीत झाले असुन, शेतीचे
काम करण्यास शेतात जाण्यासाठी तयार नाहीत.
गंगापूर तालुकयातील गोदावरी धरण भागातील अनेक गावांमधील बागायती भागांमध्ये बिबट्याचा वावर
सातत्याने वाढत आहे. मागील महिन्याभरापुर्वी भिवधानोरा, गळनिंब, धनगरपट्टी, धामोरी बु., अगरवाडगाव
परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ला केला होता.
तसेच, खुलताबाद तालुक्यामध्ये वन्यप्राणी हरीण, निलगाय, रानडुक्करे, इत्यादी वन्यप्राणी शेतकऱ्यांचे
पिकांची नासधुस, करुन नुकसान करत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे
लागत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणेकामी उपाययोजना करणे अत्यंत
गरजेचे आहे.

करीता विषयांकित सावखेडा परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करणेसाठी तात्काळ पिंजरे लावणेबाबत
संबंधित अधिकारी यांना आदेशित करावे, तसेच खुलताबाद तालुक्यातील वन्यप्राण्यांचा देखील बंदोबस्त
करणेबाबत संबंधितांना आदेशित करावे, हि विनंती.
आपला,
(प्रशांत बन्सीलाल बंब)
More Stories
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत खुलताबाद तालुक्याची मतमोजणी प्रक्रिया व तयारी बाबत.
📰 ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आढावा; निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश