February 9, 2026

नवरात्र उत्सव गिरजा देवी संस्थान म्हैसमाळ येथे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते सुरुवात

 

 म्हैसमाळ येथे उत्सवामध्ये विविध कार्यक्रम

रविवार दि.१५ ऑक्टोबर २०२३

खुलताबाद तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळ येथील जागृत देवस्थान गिरिजा मातेचा नवरा तो उत्सवाला 15 ऑक्टोबर रविवार पासून सुरत होणार असून नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गिरजा देवी संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिली आहे.

गिरजा देवी संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गिरजादेवी नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबर वरून सुरुवात होणार असून हा महोत्सव दिनांक 24 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे.

गीता देवी संस्थान अध्यक्ष स्वरूप कंकाळ व विश्वस्त पुजारी मनोहर भारती नंदू भारती राजू भारती देवस्थान अव्वल कारकून आर एन चंदेल मंडळ अधिकारी विजय चव्हाण तलाठी बंडू आव्हाड देवस्थान लिपिक ज्ञानेश्वर जाधव पोलीस पाटील संजय जाधव व म्हैसमाळ येथील ग्रामस्थ यांच्या वतीने या महोत्सवाची तयारी करण्यात आली आहे.

नवरात्र महोत्सव दरम्यान पुढील प्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहे.

आज 15 ऑक्टोबर सकाळी साडेदहा वाजता गिरजा देवी संस्थान जुने ठाणे येथे घटस्थापना होणार आहे व देवीचे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी होणाऱ्या विविध कार्यक्रमाचा जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व भक्त जणांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे.