February 9, 2026

देवी गिरजा माता यात्रा उत्सव 2025: उद्या पासून भक्तांसाठी उत्साहाचा पर्व सुरू

 

वार्ताहर: अशोक अधाने

मो. ९६२३८७१९८७
www.themaharashtratoday.com

म्हैसमाळ ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर  – तालुक्यातील प्रसिद्ध देवी गिरजा माता यात्रा उत्सव 2025 यंदा मोठ्या भक्तिभावात व धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे. ही यात्रा बुधवार, 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 15 फेब्रुवारीला महाभिषेकाने समारोप होणार आहे. महाराष्ट्रभरातून भाविक या उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी गिरजा देवी मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. सरपंच लता सचिन गिरी आणि उपसरपंच सुनीता अशोक मालोदे यांनी यात्रेच्या तयारीची माहिती दिली.

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

यंदाच्या यात्रेची धार्मिक तयारी 8 फेब्रुवारीपासून झाली आहे. दि.12 फेब्रुवारीच्या पहाटे 5 वाजता तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते देवीची महापूजा व आरती होणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री 12 वाजता मानाची काठी मिरवणूक झाली आहे.

भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू

यात्रेनिमित्त मैदानात विविध दुकानांचे आकर्षण असेल. यात रेवड्या, मुरमुरे, प्रसाद यांसह मनोरंजनाची साधने असतील. विविध पारंपरिक खेळ, ग्रामीण बाजार व खाद्यसंस्कृतीचा आस्वाद यात्रेचा आनंद द्विगुणित करणार आहेत.

भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा अनुभवावा, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी

www.themaharashtratoday.com