www.themaharashtratoday.com
आज दिनांक 05/10/2023 रोजी झालेल्या मैदानी स्पर्धेत राजीव गांधी कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय घोडेगाव, मधील दळे सोनाली भाऊसाहेब हीने मुलींच्या 19 वयोगट 1500 मीटर धावणे मधुन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला . रेहान अनिस बेग या विद्यार्थ्यांने 17वयोगट मधून 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 200 मीटर धावणे स्पर्धेत सुद्धा रेहान अनिस बेग या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला व भालाफेक स्पर्धेत सुद्धा प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
तर सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालयातून 800 मीटर धावणे स्पर्धेत पूजा काळे हीने प्रथम क्रमांक मिळवला. तर रीले स्पर्धेतून 14 वयोगटातून मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव, प्रशासकीय अधिकारी संदीप सर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रिडाशिक्षक श्री जाधव टी. एल. सर शाळेचे क्रिडाशिक्षक श्री. वाकळे एस बी सर प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
“गाव नकाशातील रस्ता मोकळा करा” — लामणगाव येथील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा — जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास; खळबळजनक घट