वार्ताहर : अशोक अधाने
दी.३० डिसेंबर २०२४
खुलताबाद तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी स्वामी संत जनार्दन विद्यालय, वेरूळ येथे उत्साहात संपन्न झाली. बिट गदाना व बिट खुलताबाद अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, गदाना येथील विद्यार्थ्यांनी व पालकांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत विजेतेपद पटकावले.
आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री. विलासजी केवट सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शिवाजी भोसले सर, केंद्रप्रमुख श्री. दिलीप बळे सर, मुख्याध्यापक श्री. नदिम शेख सर, तसेच गदाना शाळेतील सर्व शिक्षक, अंशकालीन निदेशक आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खालील प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला:
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यश
1. खो-खो
गट: वर्ग 1 ते 5 मुली
गट: वर्ग 1 ते 5 मुले
गट: वर्ग 6 ते 8 मुली
गट: वर्ग 6 ते 8 मुले
2. गोळाफेक
तनुजा बाबासाहेब काळे (वर्ग 7 वी)
3. थाळीफेक
तनुजा बाबासाहेब काळे (वर्ग 7 वी)
4. संगीत खुर्ची
गट 1 ते 5: राजनंदनी रामहरी चव्हाण (वर्ग 5 वी)
गट 6 ते 8:
प्रथम क्रमांक: राजनंदनी रामहरी चव्हाण (वर्ग 5 वी)
द्वितीय क्रमांक: गौरी दीपक अधाने (वर्ग 6 वी)
5. लिंबू चमचा शर्यत
गट 6 ते 8 मुली: तेजस्विनी साहेबराव चव्हाण (वर्ग 6 वी)
पालकांचा सहभाग
1. थाळीफेक: श्री. अशोक अधाने
2. गोळाफेक: श्री. अशोक अधाने
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता
वरील संघ व खेळाडूंनी छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
अभिनंदन व शुभेच्छा
गदाना जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी, केंद्रप्रमुख श्री. दिलीप बळे सर, शिक्षक श्री. नदिम शेख सर, श्री. पंढरी तायडे सर, श्रीमती काळे मॅडम, श्री. काजी सर, अंशकालीन निदेशक श्री. साईनाथ चव्हाण, श्री. अमोल जाधव आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती अर्चना अधाने व इतर सर्व शिक्षकांचे यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
–
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस