वार्ताहर : अशोक अधाने | दि. ०२ जुलै २०२५
छ.संभाजीनगर (प्रतिनिधी) – सानिका कॉलेज ऑफ नर्सिंग येथे जी.एन.एम. विभागाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात रमाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. चारुलता मगरे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. मनोहर वानखडे यांनी डॉक्टरांच्या कार्याची महती सांगताना म्हणाले की, “डॉक्टर हे रुग्णांचे जीवन वाचवणारे देवदूतच असतात. कोरोना महामारीत त्यांनी दाखवलेले धैर्य आणि सेवाभाव आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.”
भारतामध्ये १ जुलै हा दिवस ‘डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे महान डॉक्टर आणि माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील दिलेल्या योगदानामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा मानला जातो.
कार्यक्रमात डॉ. सुनील मगरे, सचिव साहिल मगरे, डॉक्टर रेणुका जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर हे केवळ औषधे देणारेच नव्हे, तर रुग्णांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणारे आरोग्य मार्गदर्शक आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डॉक्टरांच्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या असून, ते अद्ययावत उपचारपद्धतीद्वारे समाजाची सेवा करत आहेत.
कार्यक्रमाची सांगता करताना आयोजकांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या सेवाभावास मानाचा मुजरा केला.
More Stories
गदाना व भडजी गावच्या गुणवंत विद्यार्थिनींचे सी.ए. परीक्षेत घवघविता यश – ग्रामपंचायतीकडून भव्य सत्कार सोहळा
🔷 सत्ता बदलण्याची संधी; खुलताबाद तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत जाहीर 🔷
न्यू हायस्कूल गदाना येथे अबळाजी वाहुळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न