July 26, 2026

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदाना येथे ‘आनंदनगरी’ कार्यक्रम उत्साहात साजरा

www.themaharashtratoday.com

 प्रतिनिधी : अशोक अधाने

मोबाईल नं. 9623871987

दि. 17 जानेवारी 2026

गदाना (ता. खुलताबाद) : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदाना येथे आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ‘आनंदनगरी’ हा उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी घरून स्वतः तयार केलेले विविध खाद्यपदार्थ शाळेत आणले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या पदार्थांचा आस्वाद घेत आनंदनगरीचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन व सहकाराचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकविण्यात आले.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हिवराळे छाया रावजी यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्रीमती गवळी जयश्री सुरेश, श्री तायडे पंढरी ज्ञानेश्वर, श्रीमती बोर्डे लतिका सांडूजी, श्रीमती वाघ विजयमाला शंकर, श्री पठाण फिरोज खान नूरखान, श्रीमती गायकवाड शारदा श्रीधरराव, श्रीमती शेख आसमा बेबी रफत, श्रीमती सय्यद परवीन शौकत अली, श्री साईनाथ चव्हाण, श्री अमोल जाधव, श्रीमती रेणुका पिसे व श्रीमती अर्चना अधाने यांनी मोलाचे योगदान दिले.
हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञानाचे धडे देत बचत, नियोजन व व्यवहार कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले. मागील आठ ते दहा दिवसांपासून या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने तयारी केली होती.
या आनंदनगरी कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिकांनीही उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शैक्षणिक उपक्रमासोबतच आनंद, अनुभव व शिकण्याची सांगड घालणारा हा कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात राहील असा ठरला.

You may have missed