February 8, 2026

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदाना येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदाना येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भारतीय राज्यघटना (संविधान) यांचे विधिवत पूजन करून संविधानाच्या मूल्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या वेळी केंद्रप्रमुख श्री. दिलीप बळे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदानाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हिवराळे, शाळेतील शिक्षकवृंद तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.