– रिपोर्टर: अशोक अधाने
दिनांक: ८ जानेवारी २०२५
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात आज जिल्हास्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सराईच्या पालक गटाने कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी संगीता सावळे, गटशिक्षणाधिकारी विलास केवट, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी भोसले, केंद्रप्रमुख प्रकाश राठोड व अशोक महालकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष मनोहर गावडे सर व अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सराई शाळेच्या मुख्याध्यापिका अलका कदम आणि शिक्षक अविनाश देवतकर यांनी आपल्या शाळेच्या संघासाठी मोलाचे योगदान दिले. या विजयामुळे सराई शाळेचे नाव जिल्हास्तरीय पातळीवर झळकले असून, पालकांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा गौरव वाढला आहे.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!