संभाजीनगर
दि.११ मे २०२४
मतदान १००% करण्यासाठी संभाजीनगर चे ज्युनिअर चार्ली चाप्लीन व सुमित पंडित सह सोमनाथ स्वभावाने ची धडपड
“महाराष्ट्र भर स्व खर्चाने फिरुन चार्ली फाउंडेशन व सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या वतीने मतदार जनजागृती”
ज्युनिअर चार्ली चाप्लिन सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या मुख अभिनयातुन विविध ठिकाणी जावून मतदान १००% व्हावे याकरिता नागरिकांना हात जोडून आव्हान करित आहे.
आपल्या मूक अभिनयाने अवघ्या जगाला भुरळ घालणारे चार्ली चॅप्लीन यांची भुमिका जिवंत ठेवण्यासाठी ज्युनिअर चार्ली फाउंडेशन चे कलाकार सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का १००% वाढविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे आणि सुमित पंडित यांनी चंग बांधला आहे. महाराष्ट्र भर फिरत आतापर्यंत त्यांनी मुंबई,पुणे,बीड, संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन दिवसभर शहरांमधील वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळ पर्यंत चार्लीच्या वेशभूषेतून मुख अभिनयातुन लोकसभा निवडणूकीत नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले.चार्लीची हुबेहुब व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या ज्युनिअर चार्ली ला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.काहीही करा,पन मतदान चुकवू नका,सुट्टी आहे म्हणून गावाला जाणवु नका.बाहेरगावि असणाऱ्यांनी पोस्टल द्वारे मतदान करा असे म्हणत हात जोडून विनंती करीत,या ज्युनिअर चार्ली फाऊंडेशन व सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मंगळवार पासून महाराष्ट्र भर मतदान जनजागृती अभियानाला सुरूवात केली आहे. चार्ली फाउंडेशन च्या वतीने जनजागृती साठी,मतदान,पोलीओ,रस्ते वाहतूक सुरक्षा अथवा कुठलेही सर्वेक्षण, तो शासनाच्या खांद्याला खांदा लावून चार्लीच्या भूमिकेतून पटवून देण्याचे काम करतो.तसेच सुमित सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतो.या टीमने राज्यभरात ३१ ज्युनिअर चार्ली उभे केले आहेत.हे सर्वच चार्ली बॉलर टोपी, मिशा आणि छडी असलेल्या चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेतून मतदानाचे आवाहन करत आहेत. या मतदान जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात मुंबई व पुणे येथुन करण्यात आली.महाराष्टात आतापर्यंत विविध जिल्ह्यांतील मुख्य बस स्थानक,रेल्वे स्थानके, तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,नगरपरिषद कार्यालय, मुख्य बाजारपेठ,पोलीस स्टेशन अश्या वर्दळीच्या ठिकाणी चालींच्या भूमिकेतून सोमनाथ स्वभावाने व सुमित पंडित यांनी नागरिकांना हसवत हात जोडून मतदान करण्याचे आवाहन केले.तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई येथील कार्यक्रमाचे आयोजन माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपा मुदळ मुंडे मॅडम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख साहेब,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप खोमणे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संजय सोनवणे साहेब यांच्या प्रयत्नातून मतदान जनजागृती करण्यासाठी सहकार्य केले.
शासनाच्या खांद्याला खांदा लावून निस्वार्थ पने स्वखर्चाने हि टिम मतदानाची आकडेवारी वाढावी म्हणून धडपड करित आहे.त्याच्या या जनजागृती मोहिमेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळत आहे.व नागरिकांकडून ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावाने व सुमित पंडित यांचे सर्वदुर कौतुक होत आहे.
More Stories
सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨