जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त २१ दात्यानीं केले रक्तदान.
शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप.
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रक्तपेढी घाटी येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भरतभाऊ कल्याणकर यांच्या तर्फे अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात २१ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लाभलेले डॉ.शिवाजी सुक्रे सर अधिष्ठाता घाटी,डॉ सुरेश हरबडे अधिक्षक, डॉ.भारत सोनवणे, डॉ वैशाली नागोशे, डॉ सुनिता शेरे,राजेंद्र होळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक छावणी,डॉ,सुनिता बनकर, यांनी गाडगेमहाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करत कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ शिवाजी सुक्रे अधिष्ठाता घाटी यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की कुठलाही वाजागाज्या न करता जे सामाजिक कार्य माणुसकी समुहातर्फे तुम्ही करत आहात ते मानवीय कार्य सर्वोत्तम आहे कार्य आहे ,आज जे समाजात आपण वाढदिवसाचे कार्यक्रम पाहतो डीजे,बँड,केक,पार्टी,
वाढदिवसावर होणारा फालतू खर्च टाळून जर प्रत्येकाने सुमित पंडित यांचा आदर्श घेत जर सामाजिक कार्यात हातभार लावला तर निश्चितच गोरगरिबांना याचा फायदा होईल.या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ सुरेश हरबडे यांना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या रक्तदान शिबिरात उद्घाटक म्हणून लाभलेले राजेंद्र होळकर.वरिष्ठ पोलीस निरीक्षक छावणी यांनी देखील रक्तदान केले. त्यासह कांतीलाल भोज,राजु जाधव, पोलीस स्टेशन छावणी,सोमनाथ स्वभावाने, समाजसेवक सुमित पंडित,नागेश स्वभावाने,राहुल सुरवाडे,विकास गाडेकर,
शेख नीजाम,समीर शेख,स्वप्निल साबने,
ताराचंद आहिरे,गणेश गाईके,अजय वटकर,
सुमेध चव्हाण,सौरभ थोरात,सुनिल चव्हाण,विशाल जाधव,मुकेश जाधव,कुंदन काळे,आदीसह २१ दात्यांनी रक्तदान केले.समाजसेवक सुमित पंडित यांनी जागतिक रक्तदानाविषयी जनजागृती करून लोकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांची १ महिना २१ दिवस सलुन सेवा मोफत करुन देण्याचे सांगितले. रक्तदाते वाढावे व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे म्हणून छोटासा प्रयत्न केला.ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावाने यांनी ही केली रक्तदानाची जनजागृती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी रुग्णसेवा समूह व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनी सहकार्य केले. त्यामध्ये समाजसेवक सुमित पंडित,
ज्युनिअर चार्ली फाँडेशन चे सोमनाथ स्वभावाने,भरतभाऊ कल्याणकर,
राम पंडित,समाजसेविका सौ.पुजा पंडित, लक्ष्मी पंडित,आदिंनी सहकार्य केले.
समाजसेवक सुमित पंडित याचे आजपर्यंत ५६ व्या वेळेस झाले रक्तदान
आज ५६ व्या वेळेस सुमित यांनी रक्तदान केलय तरी ठणठणीत आहे.सुमित चा ब्लड ग्रुप -O निगेटिव्ह आहे. जूनियर चार्ली च्या माध्यमातून मी रक्तदाते वाढावे याकरिता महाराष्ट्रभर जनजागृती करीत आहे रक्त हे शासकीय रुग्णालयातच द्यावे कारण की गरजू रुग्णांना ते रक्त मोफत मिळते आतापर्यंत आम्ही १०८ पेक्षा जास्त कॅम्प आयोजित केले आहे. त्यामध्ये हजारो गरजू रुग्णांना रक्त मोफत मिळवून दिले आहे तरुणांना मी आव्हान करतो की उन्हाळ्यामध्ये रक्ताच्या खूप मोठा तुटवडा जाणवतो तर आपण नक्कीच आयुष्यात एकदा तरी रक्तदान करून बघावे समाजसेवक सुमित पंडित माणुसकी रुग्णसेवा समूह घाटी छ.संभाजीनगर
More Stories
भडजीमध्ये २० वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची खुलताबाद तालुक्यात तपासणी
खुलताबाद येथे महसूल समाधान शिबिर