February 9, 2026

छत्रपती संभाजीनगर ते विरमगाव बस सेवा सुरू..

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

गदाना (वार्ताहर) – विरमगाव ते गदाना एस.टी. बस सेवा सुरू – विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना दिलासा..

गदाना (दिनांक 05 मार्च 2025) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) वतीने विरमगाव ते गदाना या मार्गावर नव्याने बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध आणि इतर ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गदाना येथे इयत्ता 8 वी ते 12 वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि वेळेवर शाळेत पोहोचता यावे, या उद्देशाने ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.

यावेळी बस चालक आणि वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

बससेवेचे वेळापत्रक:

सकाळी 7:30 वाजता – छत्रपती संभाजीनगर येथून बस विरमगावकडे रवाना

सकाळी 8:45 वाजता – विरमगाव येथे विद्यार्थ्यांना घेऊन न्यू हायस्कूल, गदाना येथे पोहोचवणार

दुपारी 2:45 वाजता – छत्रपती संभाजीनगर येथून गदाना येथे येऊन विद्यार्थ्यांना विरमगाव येथे सोडणार

परतीची फेरी – विरमगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे मार्गस्थ

या नव्या बससेवेचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच स्थानिक ग्रामस्थांनाही होणार असून, दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर ही सेवा उपयोगी ठरणार आहे.

ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद

या बससेवेमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांनी एस.टी. महामंडळाचे आभार मानले आहेत. भविष्यात अधिकाधिक बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

— न्यूज रिपोर्टर: अशोक अधाने
मोबाईल नंबर: 96 23 87 19 87