प्रतिनिधी – अशोक अधाने
मो.९६२३८७१९८७
www.themaharashtratoday.com
खुलताबाद दिं १२ फेब्रुवारी२०२५
म्हैसमाळ येथील गिरजा देवीची सालाबादाप्रमाणे माघ पोर्णिमेला भरणाऱ्या यात्रेला बुधवारी (ता. १२) सुरुवात झाली, यावेळी मंदिर विश्वस्त समिती अध्यक्ष तथा तसीलदार स्वरुप कंकाळ यांनी सपत्निक महापुजा केली. सदरील यात्रा तीन दिवस चालते.
तालुक्यातील म्हैसमाळ येथे पुरातनकालीन गिरजा देवीचे मंदिर असुन, माघ पोर्णिमेनिमित्त भरणारया या यात्रेला राज्यभरात विखुरलेला लभाणी समाज दर्शनासाठी येतो. या यात्रेत भाविक दर्शनानंतर नवस फेडण्यासाठी रेवड्यांची मुक्त उधळण करतात, त्यामुळे प्रसादाच्या दुकानां बरोबरच रेवड्यांची दुकानंही मोठ्या प्रमाणात असतात.
जीर्णोध्दारानंतर प्रशस्त मंदिर गाभारा अन आकर्षक सभा मंडप-
म्हैसमाळ येथील पुरातन कालीन मंदिर अगदीच छोटे होते, त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांची मोठी कोंडी होत असे, मात्र आता या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला असुन, प्रशस्त गर्भगृहासह आकर्षक स सभानंडप बांधण्यात आला आहे.
म्हैसमाळ येथील गिरजा देवी मंदिरावर व परिसरात माघ पोर्णिमेनिमित्द आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दर्शनाची वाट बिकटच-
खुलताबाद-म्हैसमाळ रस्ता बांधणीचे काम संपता संपेना, या रस्त्याचे काम घाट मा त्या पर्यंत पुर्ण झाले असुन घाटमाथा ते गिरजा मंदिर ते दुरदर्शन मनोरा पर्यंतचा रस्ता पुर्णतः उखडलेल्या अवस्थेत असुन वाट दर्शनाची बिकट असल्याचे चित्र आहे.
सदरील यात्रा यशस्वीते साठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असुन, विश्वस्त समिती दर्शन व्यवस्थेवर लक्ष ठेवुन आहे.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!