November 16, 2025

गदाना येथे शिवव्याख्याते कैलास कुराडे यांचे प्रेरणादायी शिवव्याख्यान संपन्न..!

गदाना येथे शिवव्याख्याते कैलास कुराडे यांचे प्रेरणादायी शिवव्याख्यान संपन्न..!

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

गदाना  : 19 फेब्रुवारी 2025 – शिवजयंतीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त गदाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पंचामृत अभिषेक व पूजन भक्तिभावाने संपन्न झाले. या सोहळ्याला विविध जाती-धर्मातील पाच दांपत्यांनी विशेष उपस्थिती लावून सामाजिक एकतेचा संदेश दिला.

सकाळी सुरू झालेल्या पूजन सोहळ्यास गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पूजनासाठी सहभागी दांपत्यांची नावे पुढीलप्रमाणे –

✅ संतोष बंडू अधाने – गीता संतोष अधाने
✅ राहुल चव्हाण – कल्याणी चव्हाण
✅ सोमीनाथ काकडे – रूपाली काकडे
✅ अमोल वाहूळ – संध्या वाहूळ
✅ अश्फाक शेख – आस्मा शेख

या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव शिवमय झाले आणि शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले.

शिवव्याख्यानातून जागली शिवचरणांची प्रेरणा..!

रात्री ८:१० वाजता सुप्रसिद्ध शिवव्याख्याते कैलास कुराडे यांचे प्रेरणादायी शिवव्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गावातील लहानथोर, महिला-पुरुष, युवक-युवतींनी या व्याख्यानाला गर्दी केली आणि शिवचरित्राच्या तेजस्वी विचारांमध्ये रंगून गेले.

कैलास कुराडे यांनी शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास उलगडत त्यांच्या अद्वितीय दूरदृष्टी, युद्धनीती आणि प्रशासन कौशल्याचे उल्लेखनीय दाखले दिले. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत आजच्या पिढीने शिवरायांचे तत्त्वज्ञान आचरणात आणावे, असे त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून सांगितले.

मान्यवरांचा उपस्थितीत कार्यक्रमाची शोभा वाढली

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक अधाने यांनी ओघवत्या शैलीत पार पाडले. अध्यक्षस्थानी बंडू वाघ होते. यावेळी सरपंच सविता पोपट चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब अधाने, वैजनाथ अधाने, राजू चव्हाण, जनार्धन वाहूळ, पंचायत समिती माजी उपसभापती सुरेश चव्हाण, न्यू हायस्कूलचे शिक्षक रंजीत पवार सर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विष्णू चव्हाण, दत्तू चव्हाण, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या व्याख्यानाच्या माध्यमातून उपस्थितांना शिवचरित्राचे नव्याने दर्शन घडले आणि शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची प्रेरणा मिळाली.