June 12, 2025

खुलताबाद विविध कार्यकारी सोसायटीमध्ये 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण सोहळा संपन्न

 

प्रतिनिधी: अशोक अधाने | दिनांक: 26 जानेवारी 2025

www.themaharashtratoday.com

खुलताबाद विविध कार्यकारी सोसायटीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सोसायटीचे चेअरमन सुदाम चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शांताराम बारगळ, सकाहरी वाकळे, भागिनाथ मरकड, कारभारी हिवर्डे, नाना देशमुख, जी. व्ही. नागे, भागिनाथ बारगळ, अशोक मुळे, व सचिव मधुकर वाकळे यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सभासदांनी सहकार्य केले. देशभक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झालेला हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

– प्रतिनिधी: अशोक अधाने