www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
📅 दिनांक : 22 जानेवारी 2026
प्रतिनिधी : अशोक अधाने
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 तालुका खुलताबाद येथे निवडणुक प्रक्रियेच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून आज, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी, खुलताबाद येथील कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (ITI) येथे मतदान यंत्रांची (EVM) कमिशनिंग (Commissioning) प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री संतोष गुट्टे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रकाश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अत्यंत कडक सुरक्षेत आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली.
या प्रक्रियेत प्रामुख्याने
कमिशनिंग प्रक्रियेअंतर्गत, मतदान केंद्रांवर पाठवल्या जाणाऱ्या कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) यंत्रांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील कामे पूर्ण करण्यात आली
उमेदवार सेटिंग पक्रियेत बॅलेट युनिटवर उमेदवारांची नावे आणि चिन्हांचे बॅलेट पेपर लावण्यात आले.
मॉक पोल यंत्रांची अचूकता तपासण्यासाठी उपस्थित प्रतिनिधींसमोर नमुना मतदान (Mock Poll) करून त्यांची खात्री पटवून देण्यात आली.
सीलिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व यंत्रे पेपर सील’ आणि ‘अॅड्रेस टॅग’ लावून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सीलबंद करण्यात आली.
सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून
या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यात आले असून, केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी आणि निवडणूक निरीक्षक यावेळी उपस्थित होते. कमिशनिंग प्रक्रिया पूर्ण झालेली ही यंत्रे आता सुरक्षितपणे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली असून, मतदानाच्या वेळी ती केंद्रांकडे रवाना केली जातील.यावेळी 56 मुख्य कमीशनिंगच्या टिम सह इतर
निवडणूक विभागाचे संबंधित अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असे एकूण 135 अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत खुलताबाद तालुक्याची मतमोजणी प्रक्रिया व तयारी बाबत.
📰 ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आढावा; निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश