पंचायत समिती खुलताबाद येथे तहसीलदार स्वरूप कंकाल यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडली
खुलताबाद (प्रतिनिधी – अशोक अधाने) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण ठरविण्याकरिता पंचायत समिती खुलताबाद कार्यालयात दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सोडत प्रक्रिया पार पडली. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. स्वरूप कंकाल यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.
या सोडत प्रक्रियेस तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीतील नेतृत्व आरक्षणामुळे ठरणार असल्याने गावागावांत या सोडतीकडे विशेष लक्ष लागून होते.
आरक्षणाचे गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती – घोडेगाव, बोडखा
अनुसूचित जाती महिला – बाजार सावंगी, गल्लेबोरगाव
अनुसूचित जमाती – गोळेगाव
अनुसूचित जमाती महिला – भडजी
नागरिकांचा मागास प्रवर्ग – सुलीभंजन, पिंपरी, टाकळी राजे राय, पावसाळा
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – विरमगाव, खांडी पिंपळगाव, सुलतानपूर, खिर्डी, तिसगाव, पाडळी
सर्वसाधारण – येसगाव नं. 2, रसूलपुरा, वेरूळ, कागजीपुरा, सोनखेडा, धामणगाव, कसाबखेडा, सराई, निरगुडी, चिंचोली, वडोद बुद्रुक
सर्वसाधारण महिला – पळसवाडी, झरी, म्हैसमाळ, गदाना, कनकशीळ, पळसगाव, लोणी, येसगाव, देवळाना, दरेगाव, कानडगाव, तिसगाव तांडा
सदर आरक्षणानुसार सरपंच पदाची जागा ठरल्याने गावपातळीवर निवडणूक रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या असून, जनतेतून सरपंच निवडले जाणार असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
— अशोक अधाने, विशेष प्रतिनिधी
खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी आरक्षण सोडत जाहीर
पंचायत समिती खुलताबाद येथे तहसीलदार स्वरूप कंकाल यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडली.
More Stories
“गाव नकाशातील रस्ता मोकळा करा” — लामणगाव येथील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा — जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास; खळबळजनक घट