खुलताबाद
दि.१० मे २०२४
शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील पिकांची कामे सध्या जलदगतीने करणे सुरु आहे त्यातच काल अचानक झालेल्या पावसाने शेत मालांचे नुकसान झाले त्यामध्ये काही ठिकाणी बाजरी तर काही ठिकाणी हरबरा, कांदा व ईतर रब्बी हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे दिसून आले. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांना सध्या कापणी करून जमा करणे तसेच जमा झालेले पिक मळणी यंत्राद्वारे काढण्याचे काम सुरु आहे त्यातच काही ठिकाणी मळणी यंत्र वेळेवर उपलब्ध होत नाही तर काही ठिकाणी ते थेट शेतापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही त्यातच पावसाचे ढग दिसू लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे.
१० मे रोजी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे परंतु सध्या सुरु असलेल्या खासदारकीच्या निवडणुकीमुळे अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शेतकर्यांकडे प्रशासनाने काना डोळा केलेला दिसतोय असा सूर शेतकरी वर्गाकडून ऐकावयास मिळतोय.
www.themaharashtratoday.com
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस