November 12, 2025

खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा संपन्न

www.themaharashtratoday.com

दि.०९ ऑक्टोबर२०२३

गदाना : द महाराष्ट्र टुडे 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील, आरक्षणाचा आनंद चेहन्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल. आरक्षणासाठी ही पहिली आणि शेवटची लढाई आहे, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी येथे केले. आली. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे यांची सोमवारी रात्री सात वाजता खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथील टाकळी रोड वरील शेतात सभा झाली. या वेळी ते बोलत होते. जरांगे यांच्यावर जेसीबीच्या साह्याने पूष्पांचा वर्षाव करण्यात आला. फटाक्यांच्या आतिशबाजी करीत त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मनोज जरांगे यांचा सत्कार कै.साहेबराव पाटील विद्यालय च्या मुलींच्या हस्ते करण्यात आला.